"अभिजित कुठे आहे ? झोपलाय साला अजुन ... उठव रे त्याला ... "
झोपेतच मला माझ्या मित्रांचे संभाषण ऐकु आले, आणि नंतर संभवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.
हा राजेश म्हणजे ना एक नंबरचा हराम़XX माणूस (माणूस कसला, जाउदेत.). ह्यानी मला झोपेतुन जागं करण्यासाठी मध्ये काही दिवसांपूर्वी toothpaste चा वापर केला होता. (त्याचा जास्त तपशील येथे देत नाही).
तर सकाळच्या ५, सव्वा ५ च्या सुमारास डोळे चोळत मी ऊठलो, बघतो तर काय राजेश साहेब coffee चा कप घेउन माझ्या स्वागतासाठी सज्ज होते. काही मिनिटांपूर्वी मनातल्या मनात मी त्याला बऱ्याच शिव्या हासडल्या होत्या, त्याबद्द्ल मनातल्या मनातच माफी मागितली . (फ़ुकटची coffee मिळाली ना !)
विक्रम तर तयार होऊनच बसला होता. मला तयार होण्यासाठी मला अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला.
तयार होऊन घराच्या बाहेर पडलो, बाहेर तसा अंधारच होता. नेहमीप्रमाणे राजेशनी अंघोळीला सुट्टी मारली होती, त्याचा पाय खेचायची हुक्की आली.
अरे राजेश आज तो जुम्मा है, फिर भी तू नहाया नही -- मी
जो लोग गंदे होते है, वोही नहाते है. मै गंदा होता ही नही हूं, तो मैने सोचा थोडा पानी की बचत कर लूं --- राजेश.
ह्या विनोदावर हसत हसत आम्ही parking मध्ये पोहोचलो. अख्ख्या गाडीवर बर्फ़ जमा झाला होता, आणि तो काढणं अत्यंत गरजेचं होतं. कमीत कमी आरसे आणि समोरच्या काचा तरी आम्हाला साफ कराव्या लागणार होत्या. त्या स्वच्छ करण्यात अर्धा तास गेला, आणि साधारण साडे सहा च्या सुमारास आम्ही आमची यात्रा सुरु केली.
रात्री जागून बरीच गाणी CDs वर रेकॉर्ड केली होती, ती ऐकत ऐकत आम्ही रस्त्याला लागलो. रस्ते सगळे रिकामे होते. पहाटेची तांबडफुटी, गुलाबी थंडी, आणि जोडीला तलत मेहमूद ची हळव्या स्वरातली गाणी असा सगळा समन्वय साधला गेला होता. आम्ही तिघेही जण एकदम मूड मध्ये आलो होतो, कदाचीत रोजच्या धकाधकीच्या जीवनातून जरा निवांत वेळ मिळालाय हीच कल्पना सुखावत होती.
थोड्याच वेळात आम्ही आमच्या गावाच्या बाहेर पडणार होतो, आणि Motor-Way ला लागणार होतो. "एक फ़ोटो session हो जाए. motor-way पर गाडी रोकना मना है" विक्रम नी photo session ची फ़र्माईश केली.
photo session मध्ये काही वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो, आणि सरळ M40 पकडून Birmingham ची वाट धरली.
२ तास गप्पांमध्ये कसे गेले ते समजलेच नाही. मध्येच राजेशचा चेहरा एकदम चिंताग्रस्त झाला - "विक्रम तूने speedometer देखा क्या ? मरवाएगा ! थोडा गाडी धीरे चला, १२० mph के स्पीड से चला रहा है. " - राजेश.
"तुझे अभी पता चल रहा है ? पिछले घंटे भर मै ईसी स्पीड से चला रहा हूं. तुझे मारूंगा नही, लेकीन जीने का मजा दिखाऊंगा " - विक्रम.
हे संभाषण मी ऐकलं "शौक जीने का मुझको भी है, मगर ईतना तो नही." असा एक Dialogue मी मारला. (कुठल्यातरी गाण्यातील असावा - आम्ही कायम असेच filmi dialogues मारत असतो) . मग गाडी चा स्पीड कमी करून आम्ही पुढे मार्गक्रमण करू लागलो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment