Friday, February 23, 2007

ती गेली तेव्हा ...

ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता

तशी सांजही आमुच्या दारी
येऊन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा
अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणूनी
घनव्याकूळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही
मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदीच्याही
तो कृष्ण नागडा होता

-सुरेख कविता !!! - कवि ग्रेस - स्वर - हृदयनाथ मंगेशकर -

No comments: